September 20, 2026

महाविकास आघाडीचा प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ

  • कळंब – महाविकास आघाडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय) तर्फे शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर व प्रभाग क्र.०६ मध्ये दि.२१ नोव्हेंबर २०२५,शुक्रवार रोजी नारळ फोडून प्रचार मोहिमेची विधिवत सुरुवात करण्यात आली.
    बाबा नगर परिसरातील रामेश्वर महादेव मंदिर व गणपती मंदिरात उमेदवारांनी दर्शन घेऊन प्रचार यात्रेला शुभारंभ केला. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घरामध्ये भेट देत मतदारांशी संवाद साधला.
    प्रचारादरम्यान शहराचा विकास, मूलभूत सुविधा,पाणीपुरवठा,रस्ते दुरुस्ती,तसेच महिला व युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना यांची माहिती देत मतदारांशी संवाद करण्यात आला. जनतेकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष उल्लेखनीय होता.
    कार्यक्रमात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रश्मी संजय मुंदडा,तसेच प्रभाग ०६ चे उमेदवार पांडुरंग गुणवंत कुंभार व अर्चना प्रताप मोरे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या भव्य रॅलीत प्रताप मोरे,छाया कुंभार,सागर मुंढे,संजय मुंदडा, विश्वजीत जाधव,ॲड.मंदार मुळीक,मंगेश आष्टेकर,साजेद चाऊस,हरिभाऊ कुंभार,हरीश ताटे,राजभाऊ पवार,अँड.
    पृथ्वीराज देशमुख,भूषण देशमुख, अंजली ढवळे,संजय अंबिरकर, महादेव अंबिरकर,गोरोबा वरपे, पशुपती पाटील,बालासाहेब ठोंबरे, अखिल काझी,रामभाऊ जाधव, प्रवीण जाधव,ऋषिकेश वेदपाठक, रवी चराटे,ताजुदिन सय्यद, शिलानंद शिनगारे,भाऊ कुचेकर, रोहन कुंभार,नवनाथ कदम, प्रणिकेत मोर,नयन कुंभार, विकास घोडगे यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
    महिला वर्गातून अनुराधा कुंभार, सारिका कुंभार,ढगे मॅडम, रूपाली भाकरे,विजयश्री वाघमारे,मनीषा अंबीरकर,अंजली अंबीरकर, एकखंडे बाई,प्रतिभा माने,जयश्री स्वामी,रेखा आकोसकर, वनकळस बाई,सरिता मोहिते, बंदना जाधव,इंदुमती जाधव, सिंदुबाई जाधव,उर्मिला कवडे, प्रियांका लांडगे,प्रतीक्षा मोरे, रूपाली घोडगे,मंगल पवार अशा अनेक जणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
error: Content is protected !!