March 28, 2026

शिक्षण महर्षींच्या स्मृती उजळल्या : विविध शाळांत मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी मराठवाड्यातील विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

  • गुरुजींचे मुळगाव मोहा (ता. कळंब,जि.धाराशिव) येथे प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे आणि पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त सेवक विष्णुदास जाधव (मामा) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पार पडले.
    कार्यक्रमास प्रा.सुनील साबळे, विद्यार्थिनी धनश्री वीर,सर्व शिक्षक–शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • ज्ञान प्रसार प्राथमिक प्रशालेतही शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ,सौ.उषा पांचाळ, धनंजय परजणे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • संभाजी विद्यालय,पिंपळगाव लिंगी (ता. वाशी) येथे गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक सुनील बावकर, संतोष ढोले,संतोष बोडके,सुहास जगताप तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी फुरडे एल.आर.उपस्थित होते.
  • विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा (ता. भूम,जि.धाराशिव) येथे विज्ञान शिक्षक संघपाल सोनकांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले.यावेळी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
  • मराठवाड्यातील विविध ठिकाणी एकाच दिवशी शिक्षण महर्षींच्या कार्याचा गौरव करत केलेल्या अभिवादनामुळे सर्वत्र श्रद्धा व कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले.
error: Content is protected !!