कळंब – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाजी मंडई मार्गावर असलेल्या बियर शॉपीच्या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाड घालत तब्बल दोन लाख रुपयांचे मद्य लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रणजित रोहीदास हौसलमल यांनी दिलेल्या माहितीनुसार,चोरट्यांनी गोडाऊनच्या खोलीवरील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनमधील ७८ बियर बॉक्स,ज्यांची अंदाजित किंमत १ लाख ८२ हजार रुपये इतकी होते, असा मोठा माल चोरून नेण्यात आला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून चोरीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरविली आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी