कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार व अजित पवार गट) यांच्या विद्यमाने नगराध्यक्षपदासाठी प्रा.डॉ. मिनाक्षी श्रीधर भवर यांच्या उमेदवारीला कळंब तालुक्यात प्रचंड उत्साह व जनतेचा भारंभार प्रतिसाद मिळत आहे.शांत, संयमी,आपुलकीचा स्वभाव आणि समाजसेवेची अखंड निष्ठा या गुणांनी त्यांचे नेतृत्व कळंबच्या सर्वांगीण प्रगतीचे बळ ठरले आहे.
शिक्षण,समाजसेवा आणि विकासाचा त्रिवेणी संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उपप्राचार्य म्हणून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली आहे. शिक्षणक्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ उल्लेखनीयच नव्हे तर आदर्शवत मानले जाते.
नगर विकासात पारदर्शकता, प्रामाणिकता आणि लोकसहभाग हाच आपला मार्ग असल्याचे त्यांनी नेहमीच सिद्ध केले आहे. प्रियदर्शनी बँकेच्या माध्यमातून हजारो युवकांना भांडवल उपलब्ध करून देणे,तसेच शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून सतत प्रयत्न करणे या सर्व उपक्रमांतून त्यांच्या विकासदृष्टीची स्पष्ट जाण येते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. श्रीधर (बाबा) भवर व खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या सहकार्याने त्यांनी अनेक सामाजिक,आरोग्यविषयक आणि लोककल्याणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांचा मुलगा व सून हे दोघेही डॉक्टर असून,कळंब शहरात परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुरू करण्याचे त्यांचे नियोजन नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवलेल्या प्रा.डॉ.मिनाक्षी भवर यांची शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टी कळंबच्या भविष्यातील विकासाला भक्कम दिशा देऊ शकते.नगराध्यक्ष हा शहराचा प्रथम नागरिक असल्याने शहराच्या सांस्कृतिक,नैतिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी सक्षम,दुरदृष्टी असलेले नेतृत्व गरजेचे आहे—आणि हे सर्व गुण प्रा. डॉ. मिनाक्षी भवर यांच्या व्यक्तिमत्त्वात ठळकपणे दिसतात. कळंबच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज प्रत्येक मत अत्यंत मोलाचे आहे.विकासासाठी,शिक्षणासाठी, पारदर्शकतेसाठी,प्रगतिशील आणि सुसंस्कृत कळंबसाठी प्रा.डॉ.मिनाक्षी भवर यांनाच विजयी करा.आपले मत म्हणजे कळंबच्या विकासयात्रेला दिलेला थेट हातभार आहे!” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेडचे संचालक डॉ.बाळकृष्ण भवर यांनी केले आहे.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव