आढाळा – यावर्षीच्या महापुरामुळे मांजरा नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान ओळखत पुण्यातील जवळपास 300 चित्रकारांनी एकत्र येत आपले कलाप्रदर्शन भरवले. या प्रदर्शनातून आलेल्या मानधनातून धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 60 शाळांमधील शेतकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना कंपास पेटी व प्रत्येकी चार वह्यांचे वाटप पुणेस्थित आर्टिस्ट ग्रुप व रंगसमर्थ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने करण्यात आले.विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रकारांनी मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले. याच दरम्यान शाळेतील फलकावरील अतिशय सुंदर आणि मोहक हस्ताक्षर त्यांच्या नजरेस पडले.महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले हे दिग्गज चित्रकार काही काळ त्या लेखनाकडे पाहतच राहिले. त्या अप्रतिम लेखनाच्या सौंदर्याने ते इतके प्रभावित झाले की त्या फलकाचे लेखक व सहशिक्षक तुकाराम कऱ्हाळे यांचा विशेष सत्कार त्यांनी केला. याचबरोबर पुणे येथे दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या “सुंदर हस्ताक्षर” या तीन दिवसीय भव्य प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी खास निमंत्रणही तुकाराम सरांना देण्यात आले. त्यांच्या कलागुणांचा विद्यार्थ्यांनाही अभिमान वाटला.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. सुरेंद्र पाटील (संकल्पक, पुणे आर्टिस्ट ग्रुप), कृषीभूषण नितीन आण्णा थोरात, गणेश केंजळे (अध्यक्ष, रंगसमर्थ फाउंडेशन पुणे),चित्रकार रणधीन खवले, अमित जोशी,कैलास,सतीश उपळावीकर,अंकुश कानगुडे, स्वप्निल कुयते व इतर सदस्य. शैक्षणिक विभागातून शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सहशिक्षक महादेव खराटे, बलभीम राऊत,सहशिक्षिका शिवनंदा स्वामी,स्वयंसेवक बापू हगारे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. विद्यार्थीप्रिय,सर्वगुणसंपन्न शिक्षक तुकाराम कऱ्हाळे यांच्यासाठी हा प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षण ठरला.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव