February 8, 2026

साईनाथ कुऱ्हाडे यांच्या शेकडो समर्थकांचा राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये शक्तीशाली प्रवेश

  • धाराशिव – धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवारीची घोषणा होताच साईनाथ कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून प्रभागातील समीकरणांमध्ये मोठे परिवर्तन घडवले.जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा सामूहिक प्रवेश उत्साहात पार पडला.
    पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये साईनाथ कुऱ्हाडे,अशोक कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे,प्रवीण पवार, फुलचंद देवकर,दीपक कुऱ्हाडे, नितीन देवकर,अमोल देवकर, बालाजी कुऱ्हाडे,अभिषेक कुऱ्हाडे,कैलास चौगुले,सोमनाथ साळुंखे,बालाजी नवगिरे,सोमनाथ नवगिरे,नवनाथ नवगिरे,शुभम कुऱ्हाडे,अजय कुऱ्हाडे,धोंडीराम कुऱ्हाडे,वामन कुऱ्हाडे यांचा समावेश आहे.
    या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परविन कुरेशी यांच्या पती व माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी,राज्य सरचिटणीस मसूद शेख,वक्ता प्रशिक्षण विभागाचे उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश तांबारे,तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
    नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले,
    धाराशिव शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आशेने पाहत आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील हा मोठा प्रवेश म्हणजे जनतेचा वाढता विश्वास.
    नव्या कार्यकर्त्यांनी प्रभागातील विकासकामे आणि संघटन बळकट करण्यासाठी तळमळीने मेहनत घेण्याची ग्वाही दिली.
error: Content is protected !!