February 8, 2026

मोहेकर महाविद्यालयाचा मान उंचावला! एनसीसी कॅडेट उत्तरेश्वर कवडे भारतीय सैन्यात दाखल

  • कळंब –ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा कॅडेट आणि सीनियर अंडर ऑफिसर उत्तरेश्वर भगवान कवडे याने भारतीय सैन्य दलात क्लर्क म्हणून निवड मिळवत महाविद्यालयाचा मान उंचावला आहे.भारतीय सैन्य दलातर्फे जुलै २०२५ मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती.या प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत उत्तरेश्वर यांनी हे यश संपादन केले.
    या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचा सत्कार दिनांक १९ नोव्हेंबर 2025, बुधवार,सकाळी ११ वाजता ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल भाऊ मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संचालक डॉ. संजय कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,उपप्राचार्य के. डी.जाधव, उपप्राचार्य जयंत भोसले व लेफ्टनंट डॉ.हरिभाऊ पावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
    सत्कार कार्यक्रमाला लेफ्टनंट सरस्वती वायबसे,अधीक्षक हनुमंत जाधव,प्रा.अर्चना मुखेडकर, डॉ. नमनंद साठे,प्रा.राजीव कारकर, डॉ.राघवेंद्र ताटीपामुल,डॉ.नागनाथ आदाटे,डॉ.संजय सावंत,डॉ. ईश्वर राठोड, प्रा.दीपक वाळके,डॉ.वर्षा सरवदे, प्रा.समाधान चंदनशिवे, प्रा.मारुती शिंपले,प्रा.मेहराज तांबोळी,प्रा.अक्षय शिंदे,प्रा.सुनील भिसे,प्रा.बालाजी राऊत,प्रा.प्रताप शिंदे,प्रा.मधुकर माने,प्रा.रुपेश मानेकर,प्रा.दिलीप नवगिरे,प्रा.
    झाकीर काजी,प्रा.ज्योती टिपरसें, संदीप सूर्यवंशी तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    उत्तरेश्वर कवडे यांच्या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
error: Content is protected !!