February 8, 2026

जिल्ह्यात १ डिसेंबरपर्यंत जमावबंदी : निवडणुका आणि शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू

  • धाराशिव (जिमाका) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच संभाव्य शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, धाराशिव जिल्ह्यात १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १ वाजेपासून ते १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवसांसह) जमावबंदी व शस्त्रबंदीचे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
    हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर यांनी जारी केला आहे.
    पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, निवडणूक प्रचारादरम्यान विविध पक्ष, संघटना व गटांच्या सभा, रॅल्या, चर्चा आणि प्रचार कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोप-प्रत्यारोप, गटबाजी आणि वादविवादामुळे शांतता भंग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
    तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिके, घरे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले असून, पिकविमा, नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी किंवा संघटनांकडून अचानक आंदोलन, मोर्चे, धरणे, उपोषणे किंवा रास्तारोको यांसारखे कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद आहे.
    मनाई आदेशानुसार बंदी असलेल्या गोष्टी –
    शस्त्र, काठी, तलवार, बंदूक, लाठ्या किंवा इजा करणारी साधने बाळगणे
    दाहक किंवा स्फोटक पदार्थ जवळ ठेवणे,दगडफेकासाठी साहित्य साठवणे/तयार करणे,उत्तेजक भाषणे,अश्लील कृती,तणाव निर्माण करणारे फलक/चित्रे,संविधानविरोधी गाणी, घोषणाबाजी, वाद्य वाजवणे
    मानवी किंवा इतर आकृती/प्रतिमा प्रदर्शन,परवानगीशिवाय पाच किंवा अधिक व्यक्तींचे जमाव एकत्र येणे,मिरवणुका, मोर्चे काढणे,सूटीचे कार्यक्रम,अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्नसमारंभ, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय कर्मचारी, तसेच सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे (उदा. सिनेमा थिएटर, रंगमंच) यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
    सभा किंवा मोर्चासाठी परवानगी अनिवार्य
  • कोणतीही सभा, मोर्चा किंवा निवडणूक प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास, संबंधितांनी
    पोलीस अधीक्षक, धाराशिव किंवा
    उपविभागीय पोलीस अधिकारी (धाराशिव/तुळजापूर/उमरगा/कळंब/भूम)
    यांच्याकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
    अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी नागरिक व संघटनांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
error: Content is protected !!