धाराशिव (जिमाका) – लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @१५०’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय,भारत सरकार) यांच्यामार्फत २०२५ वर्ष हे भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या पदयात्रा प्रत्येक जिल्ह्यात आयोजित होणार असून त्यासोबत स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती मोहीम,सरदार पटेल यांच्या विचारांवरील चर्चासत्रे,वादविवाद स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.या उपक्रमात जिल्हा प्रशासन,माय भारत,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शाळा,महाविद्यालये,स्थानिक युवा संघटना,NSS, NCC स्वयंसेवक आणि भारत स्काऊट- गाईड युनिट्स यांची सक्रिय सहभागिता असेल. त्यानंतर जिल्ह्यातील निवडक तरुण १० दिवसांच्या ‘सरदार @१५० युनिटी मार्च’ राष्ट्रीय पदयात्रेत सामील होतील.ही पदयात्रा संविधान दिनी (२६ नोव्हेंबर २०२५) सरदार पटेल यांच्या जन्मस्थळ करमसद येथून सुरु होऊन ६ डिसेंबर २०२५ रोजी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’,एकता नगर येथे १५० किमी प्रवासानंतर समाप्त होईल. धाराशिव संस्थीय कार्यक्षेत्रामध्ये “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” आयोजित केल्या जाणार आहेत.धाराशिव येथे पहिली “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सुरू होईल. पदयात्रेचा मार्ग — जिल्हाधिकारी कार्यालय – पोलिस अधीक्षक कार्यालय – कोहिनूर हॉटेल – समतानगर – सह्याद्री चौक – महात्मा फुले चौक – श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे समारोप. हा कार्यक्रम आणि उपक्रम माय भारत पोर्टलवर नोंदणीसाठी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमात नोंदणी करून सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य