उमरगा – देशभर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा होत असताना उमरगा येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात बालदिन उत्साहात पार पडला.उमरगा रोटरी क्लब व वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित नेहरू व अन्य महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.मेंकुदळे सर (तालुका रोटरी क्लब प्रमुख) यांनी पंडित नेहरू यांचे जीवनकार्य, बालप्रेम व राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उमरगा रोटरी क्लबचे सचिव जोशी सर, उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. आळंगेकर, व्यापारी उमेश चिंचोळे, व्यावसायिक व्हंडरे, सौं. वंदना मेंकुदळे, ऍड. सौं. जोशी मॅडम, डॉ. सौं. कानडे मॅडम, मलंग उद्यालय उमरगा चे कलशेट्टी सर, तसेच वसतिगृहाचे हितचिंतक जी. आर. कांबळे उपस्थित होते. रोटरी क्लबच्या वतीने २० विद्यार्थ्यांना टी-शर्ट तर इतर २३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्या देण्यात आल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांना लाडूचे खाऊ वाटप करून बालदिनानिमित्त आनंद द्विगुणित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी केले. आभार आयुष्यमान जोशी यांनी मानले.कार्यक्रमास वसतिगृहातील सर्व विद्यार्थी व कर्मचारी कमलाकर सुरवसे,पद्मिनी सुरवसे उपस्थित होते.
More Stories
पुरोगामी विचारांची नवी दिशा; समाज विकास संस्थेच्या पुढाकारातून पुनर्विवाह संपन्न
उमरग्यात शाक्यसम्राट राजा अशोक व कांशीराम यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा