June 26, 2025

डॉ. अनिल जगताप यांचा सत्कार

  • कळंब – डॉ.अनिल जगताप यांचा जन्म बोर्ड या छोट्याशा खेड्यात झालेला. शिक्षण गावातल्या जी.प.प्राथमिक शाळेत झालेलं,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व रावसाहेब जगताप अशिक्षित परंतु धडाडीचे कार्यकर्ते होते.आई सगजानही कमालीची अडाणी व अशिक्षित, आपल्या अपत्यांना छोटेसे किराणा दुकान चालवून मोठ्या ताकदीनं आणि जिद्दीने मुलांना उच्च शिक्षण दिले,दोन मुले प्राध्यापक तर एक मुलगा एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे. डॉ.अनिल जगताप हे छ. शिवाजी महाविद्यालय कळंब येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सचोटीने व अथक परिश्रम करुन “Indian Socio -political and cultural Realities in the Selected Novels of Tabish Khair ” ह्या विषयावर प्रबंध वसंशोधनात्मक अभ्यास करून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त करून घेतली. प्रा अनिल जगताप हे हरहुन्नरी कलावंत व प्राध्यापक म्हणून सर्वदूर ओळखले जातात .ह्या त्यांच्या यशाबद्दल त्यांचा गौरव व सत्कार होतो आहे ही बाब अभिमानाची आहे.त्यामुळे त्यांचा बी.एन.शीलवंत व रमेश बोर्डेकर यांनी सत्कार केला आहे
error: Content is protected !!