बारामती – ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वप्निल कांबळे यांचा ऑल इंडिया संपादक संघाच्या बारामती तालुका कार्यकारिणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मिटींग हॉल या ठिकाणी सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ऑल इंडिया संपादक संघ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी कटिबद्ध आहे.राज्याच्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी पत्रकारांना एकत्रित घेऊन काम करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. या सत्कार समारंभा प्रसंगी प्रा.सलीम बागवान,प्रा.भिमराव अडसूळ,प्रा.गोरख साठे,सूर्यकांत सपकळ,पत्रकार दशरथ मांढरे,सुनिल शिंदे,योगेश नालंदे,साधू बल्लाळ,धनराज खंडाळे,महेंद्र गोरे,संतोष सवाणे,शुभम गायकवाड, विजय सोनवणे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शुभेच्छा सदिच्छा देत आपले मनोगत व्यक्त करत स्वप्निल कांबळे यांचे अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया संपादक संघाचे तालुकाध्यक्ष दशरथ मांढरे यांनी केले होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन