June 25, 2025

विविध ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग दिना निमित्त दिव्यांगाचा सत्कार

  • कळंब – प्रहार संघटनेने शासकीय कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने कळंब पंचायत समितीमध्ये प्रहारचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आणि तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये जागतिक दिव्यांग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव येथील ग्रामविकास अधिकारी गव्हाणे आबा यांनी दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत कार्यालय डिकसळ येथे बोलावून प्रहारचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे-पाटील तसेच शेख सादेक आतार, हजारे, कुलकर्णी ,नौशाद शेख इत्यादी दिव्यांग बांधवांचा सत्कार केला. ग्रामपंचायत कारकून अजझर भाई व सेवक उमेश गायकवाड यांनी दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी खुर्च्या इत्यादींची सोय केली.
    तसेच ग्रामविकास अधिकारी केशव गव्हाणे आबा यांनी चहापाण्याची व्यवस्था करुन दिव्यांग बांधवांशी अडीअडचणी विषयी चर्चा केली. तसेच दिव्यांगांना भविष्यात काही अडचण उद्भवल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जागतिक दिव्यांग दिन साजरा केल्यामूळे व मनमोकळी चर्चा केल्यामुळे दिव्यांग बांधवांनी ग्रामविकास अधिकारी केशव गव्हाणे आबा यांचे आभार मानले.
error: Content is protected !!