February 8, 2026

कळंबमध्ये राष्ट्रवादीचा झंझावात! नगराध्यक्षपदासह सर्व २० जागांवर स्वबळावर लढणार – सुरेश (बापू) पाटील

  • कळंब – येत्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कळंब शहरात निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.पक्ष कार्यालयात झालेल्या निवडणूक तयारी बैठकीत “नगराध्यक्षपदासह सर्व २० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार”असा ठाम निर्धार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश (बापू) पाटील यांनी व्यक्त केला.
    बैठकीस वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुशील शेळके,ज्येष्ठ नेते भास्करदादा खोसे,
    तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे, कार्याध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण यादव, महिला जिल्हाध्यक्ष सरलाताई खोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
    शहराध्यक्ष दत्तात्रय तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात पार पडली.
    या वेळी पाटील म्हणाले,“कळंब शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत संघटना निर्माण झाली असून कार्यकर्त्यांनी एकदिलाने, प्रामाणिकपणे काम केल्यास विजय अटळ आहे.जनतेचा विश्वास जिंकून विकासाचे नवे पर्व सुरू करू.”
    बैठकीत सोशल मीडियावरील प्रचार,प्रभागनिहाय संघटन बळकटी,तसेच इच्छुक उमेदवारांशी संवाद यावर सविस्तर चर्चा झाली. प्रा.डॉ.सुशील शेळके यांनी प्रभावी प्रचार तंत्राचे मार्गदर्शन केले,तर भास्करदादा खोसे यांनी पक्षातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
    या प्रसंगी युवक शहराध्यक्ष विक्रम चोंदे,उपशहराध्यक्ष अभिजीत हौसलमल,युवक प्रदेश चिटणीस शंतनू खंदारे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे,उपाध्यक्ष राहुल हौसलमल,तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून कळंब नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम विजय मिळवेल,असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!