कळंब – “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कळंब येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत देशभक्तीपर वातावरणात वंदे मातरम् गायन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत यांनी “वंदे मातरम्” या गीताचा इतिहास सांगताना माहिती दिली की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी हे गीत लिहून पूर्ण केले,आणि हेच गीत स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांच्या प्रेरणेचे स्रोत ठरले. पुढे २४ जानेवारी १९५० रोजी संविधान समितीने या गीतास राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. प्रकाश भडंगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “वंदे मातरम्” हे गीत भारतमातेच्या महानतेचे वर्णन करणारे, मातृभूमीला वंदन करणारे व देशप्रेमाची भावना जागवणारे गीत आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सी.बी.जाधव यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमात सहशिक्षिका श्रीमती बोबडे एम.एस.,श्रीमती कदम बी.एन.,श्रीमती चंदनशिवे एस.बी.,श्रीमती कोठावळे व्ही.एन. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या भावनेने “वंदे मातरम्” गीत सादर केले. संपूर्ण शाळा देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेली असून, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची नवी प्रेरणा संचारली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी