कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षक कोळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या शिक्षण महर्षींच्या कार्याला नम्र अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी