कळंब – धाराशिव व लातूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धांमध्ये विद्याभवन हायस्कूल,कळंबच्या तेजस्वी माळी (बुद्धिबळ – १९ वर्षांखालील प्रथम क्रमांक) आणि शिवक्रांती गायकवाड (६०० मीटर धावणे – विभागीय द्वितीय क्रमांक) या विद्यार्थिनींनी आपली चमक दाखवत अनुक्रमे सातारा आणि रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली आहे. या दोन्ही खेळाडूंचा सत्कार मुख्याध्यापक व्यंकट कुंभार, उपमुख्याध्यापक मायाचारी, पर्यवेक्षक कोळी तसेच क्रीडा विभाग प्रमुख संजय मडके व सर्व शिक्षकांनी केला.विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले असून सर्व शिक्षक आणि विद्यार्थी त्यांचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी