कळंब – मराठा सेवा संघ कळंब तालुका पुनर्गठन बैठक दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात उत्साहात पार पडली.या बैठकीत प्राचार्य जगदीश गवळी तालुका अध्यक्ष,प्रा.अरविंद शिंदे सचिव, प्रा.डॉ.अनिल फाटक कार्याध्यक्ष, इंजि.चंद्रकांत जाधव आणि हनुमंत मडके उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष इंजि.सतिश पाटील,जिल्हा सचिव प्रा.डॉ. संजय सावंत,जिल्हा कार्याध्यक्ष विजय पवार, समन्वयक डॉ. पुरुषोत्तम पाटील,संभाजी ब्रिगेड संघटक अतुल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक यशस्वी झाली. बैठकीत समाजातील प्रत्येक घटकाला बळ देण्याचा आणि युवकांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला. मराठा सेवा संघाच्या कार्यपद्धतीवर चर्चा करताना, समतेचा आणि एकतेचा संदेश दिला गेला.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक पदाधिकारी एकदिलाने कार्य करणार असल्याचा संकल्प व्यक्त झाला. बैठकीला स्थानिक पदाधिकारी, सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही ऐक्यता आणि नवा उत्साह समाजाला नवी दिशा देईल!
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी