कळंब – शांत,संयमी आणि मनमिळावू स्वभावाचे तसेच बहुजनांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने कार्यरत असलेले सा. साक्षी पावनज्योतचे वर्गणीदार आणि ज्येष्ठ सहायक शिक्षक चंद्रकांत वाघमारे यांची सर्वोदय विद्यालय,भोगजी येथे मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली आहे.यानिमित्ताने सा.साक्षी पावनज्योत चे कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना “वैचारिक खनिजांचा अंक” सप्रेम भेट दिला आणि त्यांच्या भावी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत असलेल्या वाघमारे सरांच्या या यशस्वी नियुक्तीमुळे सहकारी शिक्षकवर्ग आणि समाजात आनंदाचे वातावरण आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी