May 10, 2026

सेवानिवृत्त शिक्षक मिठूराव पुरी यांचे निधन

  • कळंब – शहरातील गांधी नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक मिठूराव दत्तात्रेय पुरी (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने दि.२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता दुःखद निधन झाले.
    पुरी सर हे आपल्या कार्यकाळात आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जात होते.विद्यार्थ्यांप्रती असलेले आपुलकीचे नाते,शिक्षणातील प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाण या गुणांमुळे त्यांनी सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.
    ते माजी नगरसेविका सौ.गीता महेश पुरी यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.
    पुरी सरांच्या निधनाने कळंब शहरासह शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
error: Content is protected !!