धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.01 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 190 कारवाया करुन 1,40,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-धोंडीबा प्रल्हाद सुर्यवंशी, वय 44 वर्षे, रा.काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.01.11.2025 रोजी 17.30 वा. सु विनय हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे 4,200 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-अनिल समिंदर जाधव, वय 30 वर्षे, रा.तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.01.1.2025 रोजी 19.50 वा. सु तुरोरी येथील इंदीरा नगर झोपडपट्टी मध्ये मोकळ्या जागेत उमरगा येथे अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-सारिनाथ गणपती कांबळे, वय 39 वर्षे, रा.येळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.01.1.2025 रोजी 17.35 वा. सु येळी गावातील हैद्राबाद जाणरे सर्व्हीस रोडलगत असलेले पत्राचे शेडसमोर येथे अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 25 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-सचिन गणपती कांबळे, वय 33 वर्षे, रा.नाईचाकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.01.1.2025 रोजी 16.00 वा. सु नाईचाकुर येथील डोंगरगाव चौकात अंदाजे 2,600 ₹ किंमतीची 26 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वंतत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे:आरोपी नामे-दत्तात्रय रंगनाथ सोनटक्के, वय 51 वर्षे, रा.टाकळी बें. ता. जि. धाराशिव हे दि.01.11.2025 रोजी 16.45 वा. सु टाकळी शिवारातील हॉटेल शेतकरीच्या पाठीमागे अंदाजे 2,655 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-शिवयोगी दयानंद कारभारी, वय 32 वर्षे, रा.जेवळी ता.लोहारा जि. धाराशिव हे दि.01.11.2025 रोजी 19.40 वा. सु आष्टामोड जाणारे रोडवर जुने जेवळी गावातील ओढ्याचे पुलावर अंदाजे 34,000 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 50 सिलबंद बाटल्या मोटरसायकल सह अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.01.11.2025 रोजी 15.30 वा. सु. वाशी पो ठाणे हद्दीत ईट येथील हनुमान मंदीराजवळील बाजार तळकाडे जाणारे रोडवर मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अशोक प्रभाकर गायकवाड, वय 30 वर्षे, रा. खोपेश्वर गल्ली ईट ता. भुम जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. ईट येथील हनुमान मंदीराजवळील बाजार तळकाडे जाणारे रोडवर मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-बालाजी विश्वनाथ थोरात, रा. धानुरी ता. जि. धाराशिव, हे दि.01.11.2025 रोजी 18.10 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही लोहारा बु. येथील भानुदास चव्हाण कॉलेज जवळ हायगयी व निष्काळजीपणे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून कलम-185 मोवाका चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बिरोबा सुखदेव खुणे, वय 45 वर्षे, रा.आसु ता. परंडा जि. धाराशिव यांचे व त्यांचे शेजारी राहणारे आजिनाथ खवले व शांताबाई राउत यांचे राहते घराचा कुलूप कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.23.10.2025 रोजी 08.00 ते दि.35.10.2025 रोजी 12.10 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील व लोखंडी पेटीतील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साड्या 2 व रोख रक्कम 19,000₹ असा एकुण 70,000 ₹ किंमतीचा माला चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बिरोबा खुणे यांनी दि.01.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(अ),331(3),331(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-एजाज गफुर कुरेशी, वय 42 वर्षे, रा.खाटिक गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे कळंब येथील मराठवाडा चिकन सेंटर दुकानाचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.31.10.2025 रोजी 22.00 ते दि.01.11.2025 रोजी 04.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दुकानातील 20 जिवंत बॉयलर कोंबड्या व 7 निमगावराण कोंबड्या एकुण 9,500₹ किंमतीच्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-एजाज कुरेशी यांनी दि.01.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(अ),331(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-ओम शंकर शर्मा, वय 34 वर्षे, रा. पट्टी जि. पृरतापगढ उत्तरप्रदेश ह.मु. रेल्वे निवास्थान रेल्वे स्टेशन धराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल काळ्या रंगाची क्र युपी72एक्यु0228 ही दि.20.10.2025 रोजी 20.25 ते दि.21.10.2025 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ओम शर्मा यांनी दि.01.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगरे पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“खुन.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-निखली सोमनाथ कांबळे, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.01.11.2025 रोजी 09.15 वा. सुकेशेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर मयत नामे-गुरुसिध्दप्पा उर्फ सिध्दराम पंडीत दहिटणे, वय 35 वर्षे, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद अरोपीने तुझ्या मुळे माझे वडील करंट लागुन मरण पावले या कारणावरुन लोखंडी कुह्राडीने मानेवर, गळ्यावर वार करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सिध्देश्वर दत्तु रिंगणे, वय 50 वर्षे, रा. धनगरवाडी ता. तुळजापूर यांनी दि.01.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 103(1)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-विठ्ठल सोपान काळे, रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.31.10.2025 रोजी 21.00 ते 22.00 वा. सु. माणकेश्वर येथे फिर्यादी नामे-ईरमसहेर रमलानअली शेख, वय 42 वर्षे, रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद अरोपीने बांधकाम करायचे नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ईरमसहेर शेख यांनी दि.01.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1), 296, 352, 351(2)(3), सह शस्त्र अधिनियम कलम 4,25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-गुरनाथ नागाप्पा हिरापुरे, रा. निरगुडी ता. आळंद जि. कलबुर्गी, गंगाराम कोंडीबा पात्रे, रा. निरगुडी ता. आळंद जि. कलबुर्गी, श्रीकांत मधुकर घोडके, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.11.2025 रोजी 17.00 वा. सु. वरनाळवाडी शिवारातील शांतेश्वर माठाचे शेत गट नं 107 येथे फिर्यादी नामे-शेख फरीद रसुलसाब अत्तार, वय 35 वर्षे, रा. निरगुडी ता. आळंद जि. कलबुर्गी राज्य कर्नाटक यांना नमुद अरोपींनी शेतात जनावरे का सोडले असे विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शेख फरीद यांनी दि.01.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे मुरुम येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3),3(5) सह शस्त्र अधिनियम कलम 4,25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-देविदास कृष्णाजी माने, वय 60 वर्षे, व सोबत फिर्यादी नामे- सारीका देवीदास माने, वय 50 वर्षे, रा. चंडकाळ ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. व्हनाखेरी बिदर ता. जि. बिदर हे दोघे दि.06.10.2025 रोजी 21.40 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 12 सीयु 8861 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल मधील पेट्रोल संपल्याने मोटरसायकल उमरगा येथील कन्हैया मंगल कार्यालयाच्या समोर रोडवर बाजूला थांबले असतांना चारचाकी इरटिगा क्र टीएस 10 एफएफ 3157 चालकाने त्याचे ताब्यातील इरटिगा ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून देविदास माने व सारिका माने यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात देविदास माने हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. तर सारिका माने या किरकोळ गंभीर जखमी झाल्या. नमुद कार चालक हा अपघाताची माहिती न देता जखमीस उपचार कामी घेवून न जाता कार जागेवर सोडून पळून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सारीका माने यांनी दि.01.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106, 125, (अ)(ब) सह मपोका कलम 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान