कळंब – लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय अन्नप्रक्रिया तसेच क्रीडामंत्री चिराग रामविलास पासवान यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५,शुक्रवार रोजी उपजिल्हा रुग्णालय,कळंब येथे सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे धाराशिव जिल्हा प्रमुख राजाभाऊ गायकवाड, तालुका अध्यक्ष भारत कदम, शहर प्रमुख नागेश धीरे, दीपक हौसलमल तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक जाणीव आणि लोकसेवेचा संदेश देत चिराग पासवान यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी