विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत कळंबमध्ये उत्साही पक्षप्रवेश सोहळा
कळंब – शहरातील ठाकरे गटाशी संबंधित शेकडो कार्यकर्त्यांनी दि.३१ ऑक्टोबर २०२५ वार शुक्रवार रोजी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश करून मोठी राजकीय घडामोड घडवली. हा पक्षप्रवेश सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे व शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास दर्शवून विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या शिवसेनेचा झेंडा उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी सभापती शिवाजी कापसे म्हणाले की,कळंब शहराच्या सर्वांगीण विकासासाठी,स्थानिक रोजगार निर्मितीसाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा उभारणीसाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करू.ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आता विकासाच्या विचारांना प्राधान्य देत शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, हे शिवसेनेच्या वाढीचे लक्षण आहे. तसेच शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले,शिवसेना म्हणजे कामगिरी,प्रामाणिकपणा आणि जनतेचा विश्वास.नगरपरिषद निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. या पक्षप्रवेश सोहळ्यात सौ.नाजनीम सलीम बागवान,आबू बागवान,अलीम बागवान,जुनेद बागवान,अरहान बागवान,आदिल बागवान,सोफियान बागवान, नोमान पठाण,इमरान मेहबूब बागवान,अब्बास बागवान,रेहान रतन बागवान,गुल्लू बागवान, शोएब बागवान, अरहान बागवान, आफताब बागवान, आदिल बागवान, तालेब बागवान, बबलू बागवान, बिट्टू बागवान, दानिश बागवान, सोफियान बागवान, आबेद बागवान, बिलाल बागवान, सलीम बागवान, साकिब बागवान, नोमान पठाण, रौफ बागवान, सादिक बार्शीकर, गुल्लू बागवान, अब्बास बागवान, उमर बागवान, उमर महेबुब बागवान, अब्बास मेहबूब बागवान, रेहान रतन बागवान, जफर सादेक बागवान, इमरान मेहबूब बागवान यांच्यासह शेकडो
आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,माजी उपनराध्यक्ष मुस्ताक कुरेशी,अतुल कवडे,सुरेश शिंदे,माजी नगरसेवक रोहण पारख,इम्रान मुल्ला,अमर चाऊस, बापू कदम,सचिन शिंगारे,समीर सय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकनाथ शिंदे जिंदाबाद!, विकासासाठी शिवसेना एकच! अशा घोषणा देत वातावरण दणाणून टाकले.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार