कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेला शहरातील प्रतिष्ठित दिवाळी विशेषांक ‘सा.साक्षी पावनज्योत’ दि.२९ ऑक्टोबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश भालचंद्र वेळापुरे यांना विशेषांक प्रदान करण्यात आला. हा विशेषांक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण आडसुळ,सचिव दत्तात्रय वाघ,प्रा.संजय घुले,विशाल यादव व कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ‘सा.साक्षी पावनज्योत’ या सामाजिक भान जागवणाऱ्या अंकाच्या कार्याची प्रशंसा करून विशेषांकाचे समाजभिमुख योगदान अधोरेखित करण्यात आले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी