👉 धाराशिव शहर वाहतूक शाखेने 28 ऑक्टोबर रोजी वाहतूक नियमभंगाविरोधात 377 कारवाया करून 2,32,150 रुपये तडजोड शुल्क वसूल केले.
👉 अवैध मद्यविरोधी कारवाईत मुरुम, धाराशिव ग्रामीण, वाशी व आंबी पोलीस ठाण्यांनी एकूण अंदाजे 1.5 लाख रुपये किंमतीचा सुमारे 250 लिटर गावठी दारू जप्त केली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यान्वये गुन्हे नोंद.
👉 मुरुम पोलीस ठाण्याने येणेगुर येथे अनैतिक देहव्यापार करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
👉 गुटखा व तंबाखू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई — वाशी, नळदुर्ग व तुळजापूर पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 12 स्वतंत्र गुन्हे नोंद. अंदाजे 7 लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा, तंबाखू, पानमसाला व सिगारेटचा साठा जप्त.
👉 मद्यपी चालकावरही कारवाई – लोहारा पोलीस ठाण्याने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा नोंदविला.
—
धाराशिव पोलीस दल जनतेच्या सुरक्षेसाठी अवैध धंदे, गुन्हेगारी व वाहतूक शिस्तभंगाविरोधात अशा कारवाया पुढेही सातत्याने करत राहील, असे पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांनी कळविले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य