September 11, 2026

एड्स जनजागृती रॅलीत शहरातील विविध शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

  • धाराशिव – (जिमाका) – जागतिक एड्स दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय अंतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या वतीने आज 1 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एचआयव्ही/एड्स जनजागृती भव्य प्रभात फेरीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ धर्माधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
    यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, एआरटी नोडल अधिकारी डॉ.सचिन देशमुख, डॉ.निता पौळ, डॉ.हिराकांत जाधव, उध्दव कदम, महादेव शिनगारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी डॉ.नागनाथ धर्माधिकारी यांनी उपस्थित युवकांना जागतिक एड्स दिनाचे ब्रीद वाक्य “समाजाचा पुढाकार एचआयव्ही/एड्सचा समुळ नाश” याबाबत संवेदना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नर्सिंग कॉलेजचे डॉ.शिवाजीराव घोगरे व डॉ.स्मिता घोगरे यांनी एचआयव्ही/एड्स विषयावर पथनाट्य सादर केले. प्रभात फेरीची सांगता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये शहरातील आर.पी.कॉलेज, के.टी.पाटील फार्मसी कॉलेज, के.टी.पाटील नर्सिंग कॉलेज, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, तेरणा महाविद्यालय, डॉ.शिवाजीराव घोगरे नर्सिंग कॉलेज, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, श्री.श्रीपतराव भोसले महाविद्यालय, श्रीमती सुशीलादेवी साळुंके अध्यापक विद्यालय, डॉ.स्मिता घोगरे फिजिओथेरपी कॉलेज, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज येथील युवक-युवती यांनी प्रभात फेरीत सहभाग नोंदवून एचआयव्ही/एड्स प्रतिबंध बाबतच्या विविध घोषनांनी प्रभात फेरी यशस्वी केली. कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार महादेव शिनगारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डापकू, आयसीटीसी, एआरटी, एसटीआय व विहान सामाजिक संस्था, रुग्णालयातील अधिपरिचारिका, 108 ॲम्बुलन्सचे जिल्हा समन्वयक आदींचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!