February 8, 2026

राजाभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  • कळंब – लोक जनशक्ती पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला.या प्रसंगी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा दिपावली विशेषांक कार्यकारी संपादक अविनाश घोडके व सुरज गायकवाड यांच्या हस्ते देऊन गायकवाड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

  • या सोहळ्याला मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे,लोक जनशक्ती पार्टीचे महासचिव प्रा. अशोक गायकवाड,माजी नगरसेवक सुनील गायकवाड, तालुका अध्यक्ष भारत कदम, शहराध्यक्ष नागेश धिरे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा चंदनशिवे,तालुका अध्यक्षा चांदणी सावंत,प्रविण गायकवाड,सुशिल गायकवाड,दिपाली गायकवाड,सतपाल बचुटे,सचिन तिरकर,हनुमंत पाटोळे,सुयोग गायकवाड तसेच विविध पदाधिकारी,कार्यकर्ते आणि गायरान जमीनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कार्यक्रमात गायकवाड यांच्या सामाजिक,राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत “जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा जनाधार वाढत आहे,” अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
error: Content is protected !!