कळंब – कृषि विस्तार क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत कृषिथॉन पुरस्कार प्राप्त केलेले कळंब येथील सहायक कृषी अधिकारी भुजंग लोकरे यांचा दि.२९ ऑक्टोबर २०२५ वार बुधवारी फ्रेंडस् फॉरएव्हर फाऊंडेशन व सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी लोकरे यांना साक्षी पावनज्योत दिपावली विशेषांक, शाल,पुष्पहार व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे,फ्रेंडस् फॉरएव्हर ग्रुपचे अध्यक्ष राहुल कवडे,सचिव गोपाळ उबाळे, कार्यकारी संपादक अविनाश घोडके,दिनेश अष्टेकर,परमेश्वर मोरे,डॉ.गिरीष कुलकर्णी,आस्तिक काळे,किसान मित्र कृषी प्रदर्शन–२०२६ चे समन्वयक आनंद रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. भुजंग लोकरे यांच्या कार्यातून कृषी क्षेत्रात नव्या कल्पनांची रुजवात होऊन शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग लाभला आहे,अशी भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव