मुंबई – राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.राज्य शासनाने जाहीर केलेल्या 32 हजार कोटींच्या पॅकेज अंतर्गत आतापर्यंत 8 हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असून,याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून,पुढील 15 दिवसांत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.निधीची कमतरता नाही,आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत तातडीने पोहोचवली जाईल. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील तांत्रिक अडचणी, नोंदीतील त्रुटी व एकापेक्षा जास्त खात्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.उर्वरित 10 टक्के शेतकऱ्यांपर्यंतही लवकरच मदत पोहोचवली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,अॅग्रीस्टॅक डेटामधील पात्र शेतकऱ्यांना थेट निधी त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे,तर अपात्र खात्यांवर निधी जाऊ नये म्हणून ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. नोंदणीमुळे शेतमालाच्या खरेदीत पारदर्शकता येत असून, शेतकऱ्यांना शासनाने ठरविलेल्या हमीभावानुसार विक्रीची संधी मिळणार आहे.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन