February 8, 2026

कळंब नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचा शिवसैनिकांचा निर्धार — शिवसेनेची रणधुमाळी सुरू

  • कळंब – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंब शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची एक महत्वाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शिवसेना मराठवाडा सचिव अशोकराव पटवर्धन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
    बैठकीदरम्यान सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकमुखाने ठराव केला की,कळंब नगरपरिषदेवर भगवा फडकवायचा आणि शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम राहून जनतेच्या विकासासाठी कार्य करायचं.
    शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह, संघटनेची एकजूट आणि आत्मविश्वास जाणवला.कळंबच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा नगरपरिषदेवर फडकवण्याचा निर्धार सर्वांनी दृढपणे व्यक्त केला.
    शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही,तर ती सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी जनशक्ती आहे,”असे मत या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.
    या बैठकीस शिवसेना नेते अजित पिंगळे,कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे,तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,तसेच डी.एन.कोळी, अनंत लंगडे,माजी नगरसेवक मुस्ताक कुरेशी,अतुल कवडे,रोहन पारख,संजय घुले,पिनू जाधवर, सचिन शिनगारे,सतीश टोणगे, सुशील तीर्थकर,राजाभाऊ गरड, सुरेश शिंदे,राजाभाऊ टोपे,कृष्णा हूरगट,विजय पारवे,अमर चाऊस, विशाल ठोंबरे,बाळासाहेब समुद्रे, दत्ता शेंडगे,सिद्धेश्वर शिंगणापूरे, नामदेव पौळ,मनोज पवार,शुभम गायकवाड,बळी चव्हाण,शैलेश शिंदे,राहुल चोंदे,बंडू तावरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
    बैठकीत उमटलेला शिवसैनिकांचा उत्साह आणि संघटनेचा निर्धार पाहता,कळंब नगरपरिषदेवर पुन्हा भगवा फडकण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
error: Content is protected !!