धाराशिव – अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश म्हणजे शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ११ वी, १२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, निवासभत्ता व इतर शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात. महत्वाचे म्हणजे,शासनाने ही योजना तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही लागू केली असून,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. https://hmas.mahait.org या पोर्टलवर सुरू आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेले पण प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची छापील प्रत व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे सादर करावीत, असे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी आवाहन केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान