धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 275 कारवाया करुन 2,00,150 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“अवैध मद्य विरोधी कारवाई.”
मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.26.09.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 12 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले 100 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 158 लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 113 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 39,790 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)भुम पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सिंधुबाई बलभिम काळे,वय 56 वर्षे, रा. कल्याणनगर भुम ता.भुम जि.धाराशिव हे 08.10 वा. सु.आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,000 किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-गणेश रंगनाथ पवार,वय 38 वर्षे, रा.कल्याणनगर भुम ता. भुम जि.धाराशिव हे 09.05 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत अंदाजे 1,000 किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे- हिरा कल्याण शेख, वय 64 वर्षे, रा.इंदीरानगर भुम ता.भुम जि.धाराशिव हे 10.05वा. सु. एमएसईबी सबस्टेशन भुम जवळ मोकळ्या जागेत अंदाजे 500 किंमतीची 5 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
2)बेंबळी पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-वली अब्बास शेख, वय 38 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव हे 16.50 वा. सु.आपल्या राहत्या घराचे बाजूस अंदाजे 960 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-मारुती रोहीदास लोकरे, वय 32 वर्षे, रा. धाराशिव ह.मु. समुद्रवाणी हे 14.45 वा. सु. हॉटेल वैयक्तीकचे दक्षिण बाजूस अंदाजे 1,920 किंमतीच्या 24 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
3)लोहारा पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-नेताजी सिताराम चव्हाण, वय 42 वर्षे,रा. राजेगाव ता.लोहारा जि.धाराशिव हे 10.30 वा. सु.आपल्या शेतात राजेगाव शिवार येथे अंदाजे 8,100 किंमतीचे 100 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-संतोष सुभाष दंडगुले, वय 34 वर्षे, रा. जेवळी ता. लोहारा जि.धाराशिव हे 16.49 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 4,800 किंमतीची 48 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-योगेश सुरेश जाधव, शितल योगेश जाधव, रा. हिप्परगा रवा ता. लोहारा जि.धाराशिव हे 13.30 वा. सु. हिप्परगा रवा बसस्थानक दुकानामध्ये अंदाजे 12,960 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 72 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
4)कळंब पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-आशा रामा चव्हाण, वय 40 वर्षे,रा. दसमेगाव ता. वाशी ह.मु. आंदोरा ता. कळंब जि.धाराशिव या 18.10 वा. सु.जिनींग मिल जवळ हासेगाव शिवार येथे अंदाजे 2,300 किंमतीचे 26 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-जनाबाई राजेंद्र काळे, वय 36 वर्षे, रा. नवीन पारधी नगर स्लॉट पॅन रोडवडाळा पुर्व मुंबई ह.मु. आंदोरा ता. कळंब जि.धाराशिव या 19.15 वा. सु. कळंब ते येरमाळा रोडवर आंदोरा गावात रोडलगत अंदाजे 1,700 किंमतीची 17 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
5)तामलवाडी पो ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-दत्ता अंकुश दळवी, वय 42 वर्षे, रा. गंजेवाडी ता.तुळजापूर जि.धाराशिव हे 19.30 वा. सु. गंजेवाडी येथे अंदाजे 1,900 किंमतीची 20लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 5 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
6)धाराशिव ग्रामीण पो ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सिरजेन बंडु शिंदे, वय 48 वर्षे, रा. रामलिंग येडशी ता. जि. धाराशिव हे 19.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर येडशी येथे अंदाजे 2,650 किंमतीचे 25 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
“ जुगार विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.25.10.2025 रोजी 22.30 वा. सु. वाशी पो ठाणे हद्दीत हनुमान मंदीराचे बाजूस मोकळ्या जागेत कन्हेरी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जाकीर महम्मद शिकलकर, राजेंद्र आण्णा इंगळे, रंजीत विष्णु रसाळ, सुरज सुरेश रसाळ, छगन बळीराम रेडे, वामन पांडुरंग खरात, नितीन वसंतराव रसाळ, अशोक सुखदेव रसाळ सर्व रा. कन्हेरी ता. वाशी जि. धाराशिव हे 22.30 वा. सु. हनुमान मंदीराचे बाजूस मोकळ्या जागेत कन्हेरी येथे तिरट मटका जुगाराचे साहित्या एकुण 10,6,90 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराढेाण पोलीसांनी दि.25.10.2025 रोजी 23.50 वा. सु. शिराढोण पो ठाणे हद्दीत शिराढोण तांडा येथे जय सेवालाल हॉअेलचे पत्र्याचे शेडचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-विष्णु भारत राठोड, नंदु देविदास राठोड, बबन भारत राठोड, सर्व रा. शिराढोण तांडा, लायक चाँद डांगे, सयाजी रंगनाथ कनसे, शकील सत्तार खातीब, सिध्दार्थ भगवान जोगदंड रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे 23.50 वा. सु. शिराढोण तांडा येथे जय सेवालाल हॉटेलचे पत्र्याचे शेडचे पाठीमागे तिरट मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,04,530 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले शिराढोण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-संतोष हरीबा लोहार, वय 29 वर्षे, रा. चाकुर ता. चाकुर जि. लातुर हे दि.26.10.2025 रोजी 18.29 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 बीसी 6214 ही टोलनाका येडशी येथे एनएच 52 रोडवर हायगयी व निष्काळजीपणे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून कलम-185 (3)(1)/181 मोवाका चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“शस्त्र कायद्यांतर्गतगुन्हा नोंद.”
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-योगेश सुरेश जाधव, रा. हिप्परगा रवा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.26.10.2025 रोजी 14.00 वा. सु.आपल्या राहत्या घरात लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे लोखंडी तलावर अंदाजे 500 ₹ किंमतीचे विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वत:चे जवळ बाळगलेला लोहारा पोलीसांना मिळून आला. यावर पथकाने नमुद गावठी पिस्तुल जप्त करुन फिर्यादी नामे-योगेश जाधव पोलीस अंमलदार नेमणुक पोलीस ठाणे लोहारा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4/25 अन्वये लोहारा पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-जयश्री राजेंद्र पाटील, वय 63 वर्षे, रा. मांडवा ता. वाशी जि. धाराशिव हे दि. 24.10.25 रोजी 20.00 ते दि. 25.10.2025 रोजी 08.30 वा. सु. शेत गट नं 1312 ईटकुर शिवार शेत गट नं 1312 मधील विहीरीवरील 7.5 एच पीची इकोझेन मोटर व पंखा एकुण 30,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जयश्री पाटील यांनी दि.26.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रल्हाद लक्ष्मण शेळके, वय 29 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.08.10.25 रोजी 18.00 ते दि.09.10.2025 रोजी 06.00 वा. सु.बोर्डा शिवार शेत गट नं 18 मधील कोट्यावरील बांधलेल्या दोन शेळ्या अंदाजे 25,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रल्हाद शेळके यांनी दि.26.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“लैंगीक अत्याचार.”
उमरगा पोलीस ठाणे :एका गावातील 19 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.15.02.2025 रोजी 12.00 ते दि. 22.09.2025 रोजी हि घरी असताना एका गावातील एका तरुणाने तिस लग्नाचे अमिष दाखवून लॉजवर घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. व काढलेले छायाचित्र इंस्टाग्रामवर वायरल करण्याची धमकी देवुन घडला प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.26.10.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 64(2), 64(2)(एम), 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य