भाजपनेच एसआयटी चौकशीची मागणी करावी,सत्य जनतेसमोर येईल – राणा पाटील यांच्यावर जाधवरांचा थेट प्रहार
धाराशिव – एखादं प्रकरण आपल्या अंगाशी आलं की त्यातून पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय आहे,असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केला. त्यांनी भाजपवर चिमटा काढत म्हटलं की,या प्रकरणात नेमके कोणाचे हितसंबंध आहेत हे समोर यावे,यासाठी भाजपनेच एसआयटी चौकशीची मागणी करावी. जाधवर पुढे म्हणाले,भाजपच्या प्रवक्त्याद्वारे राणा पाटील यांनी केलेले दावे सत्य आहेत का, हे शोधायला तुमच्या यंत्रणांना काही अवघड नाही.कारण सत्ता तुमची दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. त्यामुळे चौकशीला घाबरायचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी आणखी स्पष्ट केलं की, “गेल्या वीस महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या कामांना राणा पाटील यांनी जाणीवपूर्वक स्थगिती दिली. कारण आर्थिक लाभ नसेल, तर कामात अडथळा आणणे हे त्यांचं रोजचं धोरण झालं आहे. त्यामुळे विकास कोणाचा आणि अडथळा कोणाचा, हे आता जनतेलाही स्पष्ट झालं आहे.” जाधवरांनी भाजप आणि राणा पाटील दोघांनाही उद्देशून म्हटलं की, “जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही विषयांतर करत आहात, पण सत्य आता लपून राहणार नाही.”
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान