February 8, 2026

पूरग्रस्तांसाठी कळंबच्या ज्येष्ठ नागरिकांचा हातभार

  • २३,६०० रुपयांचा निधी प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या हस्ते सुपूर्द
  • कळंब – महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून शेतकरी व सामान्य नागरिकांना सावरण्यासाठी कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावले आहेत.कळंबच्या ज्येष्ठ नागरिकांनी मदत फेरी काढून तब्बल ₹२३,६०० निधी जमा केला असून हा निधी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्याकडे वाटवडा (ता. कळंब) येथे आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला.
    या वेळी जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,उपाध्यक्ष अच्युतराव माने,तालुका सचिव माधवसिंग राजपूत,यशवंत हौसलमल,संदीप कोकाटे, शिवाजीराव टेकाळे,अमृत टेकाळे, सोमनाथ टिंगरे,बंटी टेकाळे, प्रकाश टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे म्हणाले, “राज्यातील पुरग्रस्तांना मदत म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाने २१ लाख रुपयांचा निधी जमा करून मुख्यमंत्री मदत निधीसाठी सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
error: Content is protected !!