रामेश्वर – सन 1999-2000 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा २५ वर्षांनंतरचा स्नेह मेळावा श्री सरस्वती विद्यालय,रामेश्वर येथे दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात सुमारे ६० माजी विद्यार्थी एकत्र आले आणि शाळेतील आठवणी उजाळा देत आपापल्या यशोगाथा व अनुभव शेअर केले. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रगती केली.उद्योग, राजकारण,शिक्षण,पत्रकारिता, शेती,व्यापारी आणि गृहिणी अशा विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनंतर शाळेच्या प्रांगणात पुन्हा भेटताना आनंदाश्रूंच्या क्षणांना सामोरे गेले. यावेळी मुख्याध्यापक नागरगोजे बी.एल.यांनी मनोगतात सांगितले,सर्व माजी विद्यार्थी निरोगी राहा,एकमेकांच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडा.आता तुम्ही पालकाच्या भूमिकेत आहात आणि तुमची जबाबदारी वाढली आहे.समाजातील यशस्वी विद्यार्थी हेच श्री सरस्वती विद्यालयाची खरी ओळख आहे.” कार्यक्रमात गीत-संगीत, नाट्यछटा,मिमिक्री,विनोदी केबीसी,डायलॉग रिक्रिएशन आणि नृत्य सादरीकरणांनी वातावरण रंगतदार केले.जुने प्रसंग आणि शिक्षकांच्या आठवणींनी उपस्थितांना २५ वर्षांपूर्वीच्या काळात परत नेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम बोंदर यांनी केले,प्रास्ताविक अविनाश खेडकर यांनी सादर केले,तर आभार प्रदर्शन व समारोप अमोल गोळवे यांनी केला. कार्यक्रमाला प्राचार्य नागरगोजे,पर्यवेक्षक लाड एस. पी., माजी प्राचार्य व शिक्षक वर्ग उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे समाजातील योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. हा स्नेह मेळावा केवळ आठवणींना उजाळा देण्यासाठी नव्हता तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक व व्यावसायिक यशाची साक्ष देणारा देखील ठरला.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार