धाराशिव – आगामी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची आढावा बैठक व पदाधिकारी संवाद मेळावा धाराशिव येथे पार पडला.या बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे असे स्पष्ट केले. याप्रसंगी भरणे म्हणाले की,कार्यकर्त्यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागावे. शेवटच्या स्तरापर्यंत पक्षाची कामगिरी आणि विचार पोहोचवा. आमच्याकडे सक्षम उमेदवारांची फळी आहे.महायुती झाली तर वरिष्ठांचा आदेश पाळू,पण अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे लढायला तयार आहोत. धाराशिव येथे झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, स्थानिक समस्या,निवडणूक रणनीती आणि सदस्य नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व तालुका,शहर आणि ग्रामीण विभागातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कृषीमंत्री भरणे यांनी पुढे सांगितले,राष्ट्रवादी काँग्रेस हा विचार,कार्य आणि विश्वास यांवर उभा असलेला पक्ष आहे.जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरात सक्रिय राहावे.शेतकरी,युवक आणि महिला यांच्या सहभागातून पक्षाची ताकद वाढवावी. या बैठकीला आमदार विक्रम काळे,माजी आमदार राहुलभैय्या मोटे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे,गोकुळ तात्या शिंदे,खलील पठाण,अतुल जगताप,मोहनराव मुंडे,तसेच विविध सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि महिला-युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य