कळंब – तालुक्यातील लोहटा (पूर्व) या छोट्याशा गावातील उसतोड कुटुंबातील मुलगा बुद्धभूषण बाळासाहेब टोंपे याने कठीण परिस्थितीवर मात करत गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे.ग्रामीण पार्श्वभूमीवरून आलेल्या बुद्धभूषणने मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी स्वतःलोहटा (पूर्व) येथे बुद्धभूषणच्या घरी भेट देऊन त्याच्यासह त्याचे आई-वडील यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी गावचे उपसरपंच काकासाहेब अडसूळ,गणेश आडसुळ,बाळासाहेब अभंग,माने बाप्पा,शरद ठाकूर,काका चव्हाण, शिवाजी शिरसाट,पप्पू डोंगरे, भारत शिंदे,तनुजा टोंपे,रामचंद्र ढगे,लक्ष्मण गायकवाड,जरीचंद टोपे,जयश्री टोंपे,अनिता टोंपे, सुमन टोंपे,अनिल शिरसट,बापू टोंपे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना दुधगावकर म्हणाले,बुद्धभूषणचे यश हे संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.आर्थिक अडचणींवर मात करून शिक्षणाच्या बळावर उंच भरारी घेता येते,हे त्याने सिद्ध केले आहे. संपूर्ण गावकऱ्यांनी या यशाबद्दल टोंपे कुटुंबाचे अभिनंदन केले असून,बुद्धभूषण आता गावातील तरुणांसाठी आदर्श बनला आहे.
More Stories
शहरासह ग्रामीण भागात रामनवमी उत्साहात साजरी
पोलीस कुटुंबातील दोन्ही मुली डॉक्टर;खामसवाडीचा उंचावला मान
मोबाईलच्या अतिरेकाने संवाद हरवला;तरुणाई व्यसनाच्या विळख्यात – विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांचा इशारा