March 26, 2026

भाई नारायणराव लोमटे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भेटीचा सोहळा

  • शाळेला कपाट भेट देत व्यक्त केली कृतज्ञता!
    कळंब – कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपूरा येथे इयत्ता दहावी (२००५–२००६) च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीकृष्ण कळंबकर (पुणे), प्रा. संजय घुले (संचालक,ऑप्टेक कम्प्युटर),संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस आणि सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद,छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली.या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कपाट भेट देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली.मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी या भेटीचा स्वीकार केला.तसेच शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
    माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली.या शाळेमुळे आम्हाला दिशा,संस्कार आणि आत्मविश्वास मिळाला,अशा शब्दांत त्यांनी गुरुजनांविषयी ऋण व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा पेन व बुके देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी बगाडे हिने केले तर आभार नरसिंग वाघमारे यांनी मानले.
    अन्नपूर्णा शिंदे,पल्लवी गायकवाड, विशाल आंबीरकर,नरसिंग वाघमारे,अझरुद्दीन शेख,संदीप गायकवाड,अण्णाभाऊ रितापुरे, भरत गायकवाड आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
    राष्ट्रगीताने समारोप करत पुन्हा भेटूया या संकल्पाने माजी विद्यार्थ्यांनी निरोप घेतला.
error: Content is protected !!