उमरगा – समाज विकास संस्थेकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालावर राहणाऱ्या मुलांसोबत दीपावलीचा आनंद साजरा करण्यात आला.गेली अनेक वर्षे जोपासली जाणारी ही परंपरा आता समाजभावनेचे प्रतीक ठरली आहे. यावर्षीच्या कार्यक्रमात गोडधोड फराळाचे साहित्य आणि सर्व लहान मुलांना नव्या कपड्यांचे वाटप करून आनंदी दीपावली साजरी करण्यात आली.समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे शब्द केवळ वाचण्यात नव्हे तर कृतीत उतरवावेत,या उद्देशाने समाज विकास संस्थेचे कार्यकारी मंडळ दरवर्षी हा उपक्रम राबवते. भूमिपुत्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विविध भागांतील मित्रपरिवार या कार्यात सहभागी होतो. कोणी कपडे,तर कोणी फराळाचे साहित्य देऊन सहकार्य करतात.यंदा समाजसेविका सुरेखाताई मलंग,नाबार्ड बँकेचे माजी डीडीएम प्रल्हाद जोशी, भाभे साहेब,विद्याताई वाघ,तसेच डॉ.प्रतिमा कांबळे (सहाय्यक प्राध्यापक, समाजकार्य विभाग, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे) यांच्या सहकार्याने फराळ व कपड्यांची सोय करण्यात आली. यातील काही कपडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलांनाही देण्यात आले. या कार्यक्रमाला समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ,मॉर्निंग वॉक उमरगा चे पदाधिकारी मा. राज जाधव, ऍड. मंगेश येळीकर, प्रा. नागसेन कांबळे (भाऊसाहेब बिराजदार महाविद्यालय, बलसुर), इंजि. आकाश सूर्यवंशी, डॉ. निकिता वाघ, प्राचार्य सिद्धोधन कांबळे (पानसरे महाविद्यालय, अर्जापूर), पूनम कांबळे, प्रमिला राजीव पांडगळे व प्रगती राजीव पांडगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात अक्षय कामले,प्रशांत ढवळे व रंजना यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी भूमिपुत्र वाघ यांच्या हस्ते मान्यवरांना साहित्य प्रदान करण्यात आले. या उपक्रमातून समाज विकास संस्थेने केवळ दीपोत्सव साजरा केला नाही,तर समानता व संवेदनशीलतेच्या मूल्यांना उजाळा दिला — अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
More Stories
पुरोगामी विचारांची नवी दिशा; समाज विकास संस्थेच्या पुढाकारातून पुनर्विवाह संपन्न
उमरग्यात शाक्यसम्राट राजा अशोक व कांशीराम यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा