कळंब – तालुक्यातील दहिफळ येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली ढवळे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल “डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशन संस्थेतर्फे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंजली ढवळे गेली दहा वर्षे महिला सक्षमीकरण,बचत गट चळवळ आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहेत.तसेच वसुंधरा पाणलोट व्यवस्थापन प्रशिक्षण व उमेद अभियानांतर्गत गटांना प्रशिक्षण देण्याचे काम त्या करीत आहेत.त्यांच्या या सामाजिक बांधिलकी व कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी