कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्यूएसी/ रासेयो विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.15 ऑक्टोबर 2025 रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन “कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे संस्थेचे सहसचिव प्रा.संजय घुले व ग्रंथपाल डॉ. विद्युलता पवार यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी प्रा.संजय घुले यांनी विद्यार्थ्यांना मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी तसेच देशासाठी दिलेल्या योगदाना विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ग्रंथालय विभागाच्या वाचन कक्षामध्ये व कै.सोनेराव जाधव सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एक तास वाचन करून “वाचन प्रेरणा दिन “साजरा करून राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अनोखी आदरांजली अर्पण केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विद्युलता पवार यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.अनंत नरवडे यांनी केले,आभार डॉ.संदीप हंडीबाग यांनी मानले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील विठ्ठल फावडे, संजय शेंडगे,अशोक भोसले, अर्जुन घोगरे,दत्तात्रय कांबळे, दत्तात्रय गायकवाड,सुंदर कदम शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन