शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा कुस्ती स्पर्धेत विजयगर्जना!
कळंब – नळदुर्ग येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने अभिमानास्पद यश संपादन केले आहे. या स्पर्धेत महाविद्यालयातील बी.एस्सी.प्रथम वर्षाची विद्यार्थिनी पै.सृष्टी जमदाडे हिने ६५ कि.ग्रॅ. वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक मिळवून रौप्यपदक (सिल्वर मेडल) पटकावले.या कामगिरीमुळे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव पुन्हा एकदा राज्यस्तरावर झळकला आहे. हे यश संस्थेचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर आणि सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून,तसेच प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झाले.महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे मार्गदर्शक डॉ. अभिजीत मोहेकर व प्रशिक्षक सुरज गपाट यांनी सृष्टीच्या तयारीत मोलाचे मार्गदर्शन केले. या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल मोहेकर,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ. के.डी.जाधव,क्रीडा मार्गदर्शक डॉ. अभिजीत मोहेकर,सुरज गपाट यांनी सृष्टीचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या यशामुळे विद्यार्थिनी सृष्टी जमदाडे ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली असून,आगामी स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर