धाराशिव – राज्यातील शिक्षकांच्या अस्तित्वावर गदा आणणारी टीईटी परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी,अशी ठाम मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली.संघटनेचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने व जिल्हा अध्यक्ष अनंत फुलसुंदर यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक प्रतिनिधीमंडळाने ही मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनात २००५ पूर्वी सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी, पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि दर्जेदार मध्यान्ह भोजन द्यावे, शाळांमध्ये मोफत इंटरनेट,वीज, शुद्ध पाणी व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करावी,तसेच दिवाळी सुट्टीतील प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतरच घ्यावे,अशा मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संतोष भोजने,अनंत फुलसुंदर,गोरे सर,माळी सर, सुरवसे,पंकज काटकर,लहु सुरवसे,विशाल जाधव,भालेकर यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान