कळंब – शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना सरकार फक्त पाहत आहे,अशी टीका करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. कळंब तालुक्यातील डिकसळ येथील कार्यक्रमात बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळावा,कर्जमुक्ती होईल आणि नुकसानीची १०० टक्के भरपाई मिळावी,यासाठी ताकदीचं आंदोलन उभारावं लागेल. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे सांगितले आणि शासकीय निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप तातडीने सुरू करावे,अशी स्पष्ट भूमिका मांडली.जरांगे पाटील म्हणाले, “जो कुणी हा जीआर रद्द करण्याची भाषा करेल, त्याला आधी करून दाखवायला सांगा.दिवाळीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप पूर्ण करा आणि मराठ्यांच्या मुलांना प्रमाणपत्र मिळाले नाही,तरी कोणतीही शासकीय भरती घेऊ नका.” जाणकार सूत्रांनी सांगितले की, कुणबी प्रमाणपत्र हा ७५ वर्षातील ऐतिहासिक विजय आहे आणि हा जीआर त्यांनी लढून मिळवला आहे.जरांगे पाटीलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले,पण वाट बघणं थांबवून प्रमाणपत्राचे वाटप सुरू करण्याची मागणी केली आहे.
More Stories
भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार