कळंब – कळंब नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली. जिल्हा व तालुका पातळीवरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मोठा संख्येने सहभाग होता. बैठकीत कळंब नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. महायुती सरकारच्या माध्यमातून कळंब शहरात आणि तालुक्यात झालेले विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन त्याची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते अजित पिंगळे म्हणाले की,आपण केलेली विकासकामे हीच आपली ताकद आहे.ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे.नागरिकांच्या विश्वासाला उतरून पुन्हा एकदा कळंब नगरपरिषदेवर भगवा फडकवूया. गट-तट विसरून सर्वांनी एकदिलाने शिवसेनेच्या विजयासाठी झटावे. तसेच आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटीकरण,आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनिती ठरविण्यात आली.प्रत्येक प्रभागात संघटन अधिक सक्षम करण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. बैठकीत शिवसेना नेते अजित पिंगळे,युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे पाटील,उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे,तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,शहराध्यक्ष गजानन चोंदे,माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी,माजी नगरसेवक रोहन पारेख,अतुल कवडे,प्रताप मोरे,खामसवाडी सरपंच अमोल पाटील,सचिन शिनगारे,विजय पारवे,अमर चाऊस,योगेश अंधारे, बळी चव्हाण,सम्राट गायकवाड, राजाभाऊ टोपे,कृष्णा हुरगट, दीपक यादव,बंडू तावरे,भास्कर पारेकर,विशाल ठोंबरे,मनोज पांचाळ,बापू कदम,प्रमोद करवलकर,सिद्धेश्वर शिंगणापुरे, नामदेव पौळ,बाळासाहेब समुद्रे,विकास गडकर,दत्ता शेंडगे,सुरेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा नगरपरिषदेवर फडकवण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करण्याची शपथ घेतली. कळंब नगरीत शिवसेनेचा निर्धार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता,“कळंब नगरपरिषदेवर पुन्हा भगवा फडकणार,हीच जनता आणि कार्यकर्त्यांची एकमुखी इच्छा आहे!”
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर