February 9, 2026

“लेक लाडकी अभियान” आणि “पर्याय संस्था”चा मानवतेचा हात पूरग्रस्त महिलांना २०० किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

  • कळंब – धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे उघड्यावर पडलेल्या अनेक कुटुंबांच्या महिलांना “लेक लाडकी अभियान महाराष्ट्र” आणि “पर्याय संस्था” यांच्या संयुक्त विद्यमाने मदतीचा हात देण्यात आला. या अंतर्गत २०० किराणा किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
    दि.१२ ऑक्टोबर रोजी हासेगाव (केज) येथील पर्याय संस्था प्रशिक्षण केंद्रात हा उपक्रम पार पडला.“लेक लाडकी अभियान”च्या प्रमुख ॲड.वर्षाताई देशपांडे व त्यांच्या टीमने सातारा जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व संस्थांकडून मदत गोळा करून ती स्वतःच्या खर्चाने पुरग्रस्त भागात पोहचवली.
    या उपक्रमात एकल,विधवा आणि पूरग्रस्त महिलांना विशेषत्वाने मदत करण्यात आली.देशपांडे म्हणाल्या की, “पूरग्रस्त कुटुंबांना सरकारकडून योग्य ती मदत मिळणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणे,अंगणवाडी, शाळा तसेच शेतजमिनींचे नुकसान झाल्याने त्याचा सविस्तर पंचनामा करून शेतकऱ्यांनाही भरीव मदत मिळावी.”
    हा कार्यक्रम पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथअण्णा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी विलास गोडगे,भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे,सुनंदा खराटे, विकास कुदळे,रोहिणी कोठावळे, रियाज शेख,वैभव चोंदे,कल्पना जतकर,आशाबाई तोडकर,माया लडके,अशोक शिंदे,दिगंबर लडके आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!