मोहा (ता. कळंब) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रेरणेने आणि ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज लि. मोहा तर्फे दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कारखान्याच्या सर्व सभासदांना दीपावलीनिमित्त गुळ पावडर व साखर वाटप करण्यात आले.
या उपक्रमात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके, कार्यकारी संचालक डॉ. संतोष (भैय्या) मडके, मोहेकर मल्टीस्टेटचे सीईओ विशाल (बाबा) मडके, अकाउंट विभाग प्रमुख इम्रान शेख, आयटी विभाग प्रमुख प्रमोद मडके, फंड मॅनेजर सुरज मडके, लेखा विभाग प्रमुख मयूर जोशी तसेच मोहा गावातील सर्व शेतकरी सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके बोलताना म्हणाले की,सहकारातूनच ग्रामविकास साध्य होऊ शकतो असे प्रतिपादन करत,कारखान्याशी निष्ठा व एकात्मता जोपासण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन