March 26, 2026

तालुका क्रीडा स्पर्धेत ज्ञान प्रसार विद्यालयाचा बहारदार विजय

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळ चे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच कळंब येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
  • गोळाफेक स्पर्धेमध्ये सृष्टी जाधव हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर झीनत शेख हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रज्वल मडके या विद्यार्थ्याने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाचा गौरव वाढवला.
  • या विजयी विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य अविनाश मोरे, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक सतीश कानगुडे, तसेच प्रा. सुनील साबळे, प्रा. रोहित मोहेकर, प्रा. अमित जाधव, प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. विठ्ठल जाधव, प्रा. राहुल भिसे, प्रा. चंद्रशेखर गिरी, सहशिक्षक शैलेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
    या यशानिमित्त संस्थेच्या अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर,सचिव डॉ. अशोकराव मोहेकर तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विभागीय स्तरावर अधिक मोठ्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!