सभापती,उपसभापती,संचालक व कर्मचाऱ्यांचा पुढाकार – एक महिन्याचे मानधन व वेतन पुरग्रस्तांसाठी
कळंब – यावर्षी कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घालून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन उभी पिके पाण्याखाली जाऊन नष्ट झाली आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माल घेऊन येणाऱ्या सुमारे ८० ते ९० टक्के शेतकरी बांधवांचे सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर,शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब यांच्याकडून सामाजिक जबाबदारीची भावना जपत विशेष पुढाकार घेण्यात आला.समितीचे सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाने आपले एक महिन्याचे मानधन व भत्ते,तर सर्व कर्मचारी बांधवांनी आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. सदर मदत रक्कमेचा धनादेश सभापती,उपसभापती व संचालक मंडळाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,उपसभापती श्रीधर भवर,संचालक बाळासाहेब पाटील,कोल्हे नाना,भारत सांगळे, पिंटू लंगडे,हरिचंद कुंभार तसेच सचिव दत्तात्रय वाघ उपस्थित होते. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या या मदतीमुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी