महाराष्ट्र राज्य स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये ग्रामीण खेळाडूंची घवघवीत कामगिरी
पुणे – महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी, उंद्रि (पुणे) येथे दिनांक २५ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत शिवछत्रपती स्क्वॉश अकॅडमी कळंबच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर चमकदार यश संपादन केले.ग्रामीण भागातील या खेळाडूंनी आपली छाप उमटवित कळंबचे नाव राज्यभर गाजवले. या स्पर्धेत अकॅडमीतील खेळाडूंची यशस्वी कामगिरी – सत्यजितराजे चेतन कात्रे – नऊ वर्षे वयोगट, रौप्यपदक,विराज शिवाजी शिंदे – अकरा वर्षे वयोगट,कांस्यपदक,वेदांत राजाभाऊ शिंदे – अकरा वर्षे वयोगट,रौप्यपदक,प्रांजल नामदेव पवार – अकरा वर्षे वयोगट, कांस्यपदक,वसुंधरा मुकुंद नांगरे – सतरा वर्षे वयोगट,सुवर्णपदक (उल्लेखनीय बाब म्हणजे ती प्रत्यक्षात १५ वर्षे वयोगटातील असूनही वरच्या गटात खेळून प्रथम क्रमांक पटकाविला.),विनय राजाभाऊ शिंदे – पंधरा वर्षे वयोगट, कांस्यपदक या सर्व यशस्वी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू कोच अभिनव सिन्हा यांच्यासह रवींद्र नवले, सचिन शिंदे,करण गायकवाड,राजाभाऊ शिंदे,मुकुंद नांगरे,महादेव बोंदर,प्रशांत घुटे,अनिल शिंदे,शरद गव्हार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, लक्ष्मण मोहिते,संजयजी घुले, जिल्हा क्रीडा अधिकारी हरनाळे, क्रीडा अधिकारी लटके, नाईकवाडी,बिराजदार,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तानाजी चौधरी,जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव महेशराजे निंबाळकर,सहसचिव कुलदीप सावंत,चेतन कात्रे,बालाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कळंबसारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी शहरांमध्ये प्रचलित असलेल्या खेळात राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून आपली ताकद दाखवून दिली आहे.या कामगिरीमुळे शिवछत्रपती स्क्वॉश अकॅडमी कळंबने महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर